lonavala resorts | lonavala hotels | lonavala places to visit | lonavala hill station | lonavala places to visit in one day | places to visit in lonavala for couples | lonavala to khandala | Lonavala Information | Lonavala Latest Info

Table of Contents

मित्रांनो आज आपण एका नवीन ठिकाणाविषयी माहिती घेणार आहोत तुम्हाला तर माहितीच आहे की रोज काम करून करून आणि तेच तेच जीवन जगून फारच कंटाळा येतो म्हणूनच या धकाधकीच्या जीवनामधून थोड्याशा विश्रांतीसाठी एक छान आणि उत्तम पर्यटन स्थळ म्हणजे लोणावळा होय. | Lonavala Latest Info

Lonavala
Lonavala

सह्याद्रीतील सुंदर असे थंड हवेचे ठिकाण तसेच अप्रतिम सौंदर्य यामुळेच या ठिकाणाला सह्याद्रीचे रत्न असे सुद्धा म्हटले जाते.

शिल्प कलेचा उत्तम नमूना!! पुण्या जवळील हे ठिकाण.

लोणावळा | Lonavala Latest Info | lonavala weather

लोणावळा हे एक थंड हवेचे ठिकाण असून याच्या शेजारीच असलेला खंडाळा आणि आजूबाजूचा परिसर तसेच शेजारी असलेले किल्ले, धरण, तलाव, उंच टेकड्या, खोल दरी यांची पर्यटकांना भुरळ पडते आणि येथे सर्वात जास्त गर्दी होते.

लोणावळा हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असून समुद्रसपाटीपासून 630 मीटर उंच असल्यामुळे येथील वातावरण हे थंड असे असते.

लोणावळा हे पुण्यापासून 66 किलोमीटर तर मुंबईपासून 83 किलोमीटर अंतरावर आहे.

Google Maps

इतक्या जवळ अंतरावर असल्यामुळे वीकेंड्सला येथे फारच गर्दी असते.

संपूर्ण लोणावळ्याचे वातावरण हे नयनरम्य तसेच विविध वनस्पतींनी समृद्ध असे आहे.

आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोणावळ्या मधील उंच अशा दर्या खोऱ्यांमध्ये फिरण्याचा आनंद काही औरच असतो.

लोणावळ्यापासून जवळच अंतरावर भुशी धरण आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या धरणावर भिजण्याचा आनंद फारच सुंदर असतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोणावळ्यातील खाद्यपदार्थ चिक्की हा सर्वात प्रसिद्ध असून येथील इतरही पदार्थ फारच चविष्ट आहेत.

लोणावळ्याला फिरायला गेल्यानंतर तेथील आठवण म्हणून काही वस्तू किंवा भेटवस्तू म्हणून येथील मार्केटमध्ये लाकडी खेळणी, हस्तकलेच्या वस्तू, बांबूच्या टोपल्या अशा अनेक वस्तू मिळतात.

लोणावळ्यापासून कार्ले ही लेणी 10 किलोमीटर अंतरावर तर भाजे ही लेणी 12 किलोमीटर आहे.

लोणावळ्यापासून खंडाळा अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असून तेथील तिकोना, लोहगड, विसापूर असे अनेक किल्ले गिर्यारोहकांना आणि इतिहास प्रेमींना आकर्षित करतात.

चला फिरायला… सर्वात उंच ठिकाण. धोडप गड..

लोणावळ्याचा इतिहास : | Lonavala History

लोणावळा हा एक संस्कृत शब्द ‘लोणावली‘ या शब्दापासून तयार झालेला असून या शब्दाचा अर्थ अनेक गुहांचा समूह असा होतो.

तसे म्हटले तर हे नाव अगदी योग्य आहे कारण, लोणावळ्यामध्ये खूप प्राचीन लेणी आहेत त्यापैकी काही दुसऱ्या शतकातील सुद्धा आहेत.

या लोणावळ्याच्या परिसराचा समृद्ध असा सांस्कृतिक इतिहास हाच वारसाचा पुरावा आहे.

आपल्या भारताच्या इतिहासात म्हणजेच मध्ययुगीन काळात जेव्हा हा संपूर्ण प्रदेश जेव्हा मुघलांच्या ताब्यात आला तेव्हा लोणावळ्याचे महत्त्व फारच वाढले.

या मुघल सम्राटांनी लोणावळ्याचे नैसर्गिक सौंदर्य ओळखून या परिसरामध्ये अनेक वस्तू आणि विविध किल्ले बांधले.

यातीलच एक सुंदर असा किल्ला म्हणजे लोहगड होय हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर वसलेला असून आजूबाजूच्या दऱ्या मुळे या गडाला एक फारच सुंदर दृश्य प्राप्त होते.

त्यानंतर जेव्हा ब्रिटिशांचा काळ आला तेव्हा यांनी या प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्य ओळखून तसेच येथील थंड हवामानामुळे या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे सुद्धा हे एक लोकप्रिय स्थान बनले.

या ब्रिटिशांनी विविध पदाधिकाऱ्यांसाठी येथे लोणावळा हिल स्टेशन म्हणून विविध शैलीमध्ये बंगले आणि रिसॉर्ट्स तसेच वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन बांधले.

इतके महत्त्वाचे स्थान असल्यामुळे येथे त्यांनी एक प्रमुख रेल्वे जंक्शन सुद्धा काढले आणि त्याला फार महत्त्व सुद्धा प्राप्त झाले.

हे रेल्वे जंक्शन 1858 मध्ये मुंबई ते पुणे असे तयार झाले आणि त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यात भर पडली.

मुंबई – पुणे हायवे 2002 मध्ये पूर्ण झाल्यामुळे लोणावळ्याची लोकप्रिय अजूनच वाढून मुंबई आणि पुणे दरम्यान चा प्रवासाचा वेळ आणि काळ हा फारच कमी झाला.

अद्भुत असा कुंभे धबधबा…

लोणावळ्यातील प्रमुख आकर्षण : | Lonavala Latest Info

चिक्की हे लोणावळ्यातील प्रमुख आकर्षण असून येथील स्थानिक लोक हे त्यांच्या शेतात पिकवलेल्या फळांपासून जाम आणि जेली यांचे उत्पादन देखील करतात.

अलीकडच्या वर्षांमध्ये या पर्यटनामध्ये अधिकच वाढ झालेले असून येथील हिरव्यागार दऱ्या, धबधबे, तलाव हे आकर्षण आहे.

लोणावळ्यातील प्राचीन अशा लेणी आणि त्यामधील कोरीव काम विविध प्रकारची शिल्पे आणि शिलालेख यामुळे भारतीय कला आणि संस्कृतीचे दर्शन घडते.

नैसर्गिक आणि ऐतिहासिक अशा आकर्षणांशिवाय लोणावळ्यामध्ये मनोरंजन हे अधिक प्रमाणात दिसून येते तसेच येथे हॅकिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग अशा प्रकारच्या क्रिया येथील पर्यटकांमध्ये जास्त दिसून येतात तसेच पर्यटकांच्या करमणुकीसाठी वॉटर पार्क, वॅक्स म्युझियम मधील विविध मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन सुद्धा विलोभनीय आहे.

देवकुंड धबधबा 2023, सर्व माहिती.

लोणावळा आणि खंडाळा | Lonavala & Khandala

लोणावळा आणि खंडाळा हे दोन्ही ठिकाणी सह्याद्रीच्या रांगांमध्ये असून दोन्ही सुद्धा हिल स्टेशन्स असल्यामुळे एकच समजले जाते मात्र असे नाही.

लोणावळा आणि खंडाळा दोन्ही ठिकाणे ही महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील आहेत.

तसेच त्यांचे निसर्ग सौंदर्य टेकड्यांवरील धुके आणि थंड असे वातावरण हे सर्व काही समानच आहे मात्र तरीही लोणावळा आणि खंडाळा ही वेगवेगळे ठिकाणे असून फक्त काही किलोमीटरचे अंतर्यांमध्ये आहे.

लोणावळ्यातील प्रसिद्ध निवास | resort in lonavala | lonavala hotels | lonavala resorts

लोणावळ्या आणि खंडाळ्यामध्ये लक्झरीअस रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स, बजेटेड होम स्टे अशा विविध प्रकारचे निवासांसाठी विविध प्राध्यान्यांसह बजेटमध्ये ऑफर्स उपलब्ध आहेत.

स्थानिक खाद्यपदार्थ | Lonavala’s Local Food

लोणावळ्यातील स्थानिक खाद्यपदार्थांची सर्वांनाच भुरळ पडलेली आहे येथील चिक्की ही गुळापासून आणि भाजलेल्या शेंगदाण्यांपासून बनवलेले असून या चिक्की मुळे तोंडाला पाणी सुटते.

याशिवाय वडापाव, पोहे, भेळपुरी, मिसळपाव, बटाटा वडा, साबुदाणा खिचडी, स्ट्रॉबेरी क्रीम, मोदक, महाराष्ट्रीयन थाळी इतर पदार्थही फारच अप्रतिम अशी चव देतात.

लोणावळ्यातील प्रसिद्ध पदार्थ | What is Lonavala famous for? | Lonavala’s Best Food

लोणावळ्यातील गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की हे गुळ वितळवून त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून एक चिकट आणि कुरकुरीत अशाप्रकारे कॅंडी सारखी चिक्की बनवली जाते.

चिक्की ही वेगवेगळ्या प्रकारची असून तीळ फुटाण्याची डाळ नारळ चॉकलेट सह अनेक विविध फ्लेवर मध्ये तुम्हाला येथील चिक्की मिळेल येथील चिक्की ही ताजी असून येथे ही चिक्की घेण्यासाठी तुम्हाला असंख्य दुकाने भेटतील.

लोणावळा भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ | In which season Lonavala is best? | lonavala weather

खरे तर या ठिकाणाला भेट देण्यासाठी संपूर्ण वर्षभर तुम्ही केव्हाही जाऊ शकता तसेच या ठिकाणी जाण्यासाठी तुमच्या  वैयक्तिक पसंती वर सर्व काही अवलंबून आहे.

ऑक्टोबर ते मे या महिन्यांमध्ये पावसाळा संपून गेलेला असतो त्यामुळे येथील वातावरण हे अल्हाददायक असून नैसर्गिक सौंदर्य हे फारच सुंदर पद्धतीने खुललेले असते.

डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये येथील वातावरण हे फारच थंड असून तापमानाचा पार आहे 12 अंशांपेक्षा खाली गेलेला असतो. सकाळ संध्याकाळी थंडी असल्यामुळे या काळामध्ये जाताना लोकरीचे कपडे अवश्य घेऊन जा.

मार्च ते मे मध्ये या ठिकाणचे वातावरण थोडेसे वाढलेले  असते.

लोणावळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील कारवीची फुले (स्ट्रोबिलाँथेस कॅलोसा) ही जांभळ्या रंगांची असून संपूर्ण डोंगरावर सुंदर अशा प्रकारच्या गालीचा तयार करतात.

ही फुले शक्यतो पावसाळ्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आढळून येतात खास या फुलांसाठीच येथे अनेक पर्यटक आणि छायाचित्रकार सुद्धा येतात.

कसे पोहोचाल | Lonavala How to Reach |

हवाई मार्गे ने कसे जाल :

लोणावळ्या जवळील सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून लोणावळ्यापासून जवळजवळ 70 किलोमीटर अंतरावर आहे.

या विमानतळावरून टॅक्सी किंवा कॅब मिळते हे कॅब लोणावळ्याला पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.

रेल्वेने ने कसे जाल : lonavala to pune local

तुम्ही जर रेल्वे ने या ठिकाणी येण्याचे ठरवले असेल तर संपूर्ण देशातील रेल्वे स्थानकांशी लोणावळा रेल्वे स्टेशन जोडले गेले आहे.

बस ने कसे जाल :

लोणावळा हिल स्टेशन हे पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर असून जर कारणे जाणारा असाल तर खोपोली, कर्जत, तळेगाव दाभाडे या मोठ्या शहरांपासून जाता येते तसेच बसने जाणे सुद्धा फारच सोयीस्कर आहे .

लोणावळ्यातील पाहण्यासारखी  ठिकाणे : | Lonavala places to visit | places to visit in lonavala

1.राजमाची पॉईंट

हे लोणावळ्यापासून 10  किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणचा सर्व परिसर अप्रतिम असा आहे

तसेच हे ठिकाण 2710 फूट उंचीवर असून येथे प्राचीन गुहा आणि मंदिरे सुद्धा आहेत.

rajmachi point

2. टायगर लीप किंवा टायगर पॉईंट

हे सर्वात जास्त भेट दिले जाणारे ठिकाण असून साडेसहाशे मीटर खोल दरी येथे पाहायला मिळते.

या दरीला तेथील स्थानिक लोक टायगर लीप किंवा वाघदरी असे सुद्धा म्हणतात.

हे फारच उंच असल्यामुळे येथे जे पावणारा वारा हा वाघासारखा येत असल्यामुळे याला असे नाव पडले असावे. या ठिकाणावरून सूर्योदय आणि सूर्यास्त असे दोन्हीही पाहता येतात.

3. भुशी डॅम किंवा भुशी धरण.

भारतातील तांत्रिक प्रशिक्षण देणारे नऊ दलाचे सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणजेच आयएनएस शिवाजी आणि लोणावळा या दोन्हींच्या मध्ये असलेले भुशी धरण हे इंद्रायणी नदीच्या काठी बांधण्यात आलेले आहे.

हे हा संपूर्ण परिसर आजूबाजूच्या डोंगराळ भागाने वेढलेल्या असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची फार जास्त गर्दी असते येथे आजूबाजूला असलेल्या टेकड्यांवरून पडणारे पाणी आणि आजूबाजूचे हिरवाईने नटलेले सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

bhushi dam
Bhushi Dam

4. लोहगड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले भूमी, ही महाराष्ट्राची माती असून लोणावळ्या पासून 16 किलोमीटर अंतरावर लोहगड किल्ला आहे व या जवळच विसापूरचा सुद्धा किल्ला आहे लोहगडच्या किल्ल्यावर तुम्हाला ट्रेकिंग करता येईल.

5. भाजे आणि कार्ला लेणी

मळवली या ठिकाणी कारला ही लेणी असून कारला लेणी पासून भाज्याही 8 किलोमीटर अंतरावर लेणी आहे.

या लेण्यांची निर्मिती ही इसवी सन दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात झाल्यामुळे हा एक स्थापत्य कलेचा अद्भुत असा नमुना आहे. तसेच या ठिकाणी एकविरा मातेचे प्रसिद्ध असे मंदिर सुद्धा आहे.

bhaje and Karla caves

 6. ड्युक नोज (Dukes Nose)

या ठिकाणावरून खंडाळा घाट घाटाचे श्वास रोखून धरण्यासारखे विहंगम असे दृश्य दिसते याच ठिकाणाला तेथील स्थानिक लोक नागफणी असे सुद्धा म्हणतात.

येथील शिवमंदिर हे प्रसिद्ध असून हे फारच प्रसिद्ध असे ठिकाण आहे हा परिसर निसर्गरम्य असून येथे निरोशांतता आणि सरळ तसेच खोल अशा दऱ्या येथे आहे.

Dukes Nose

7. कुणे धबधबा 

हौशी पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणजे कुणे धबधबा होय.

सह्याद्री पर्वत रांगा मध्ये मध्ये 622 मीटर असा धबधबा असून या येथे साहसी खेळ सुद्धा आहेत रॅपलिंग आणि झिपलाइनिंग चा सुद्धा आनंद येथे घेता येतो.

8. रायवूड पार्क

लोणावळ्यातील सिद्धार्थ नगर येथे लहान मुलांसाठी उद्यान सुंदर बगीचा, लॉन हे सर्व जवळजवळ 25 एकर मध्ये पसरलेले असल्यामुळे हे पर्यटकांचे एक आवडते ठिकाण आहे तसेच या ठिकाणी फारच जुन्या प्रजातीचे वृक्ष झाडे सुद्धा आहेत. 

9. कॅनियन व्हॅली

उल्हास नदीकाठी केनियन व्हॅली असून अनेक गिर्यारोहक येथे खूप जास्त प्रमाणात येतात. लोणावळ्यापासून ७ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून हे एक खूप मोठ्या प्रकारचा धबधबा येथे पाहायला मिळतो

10. सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम

हे म्युझियम सुनील कंडुलकर यांनी सुरू केलेल्या असून येथे विविध महान व्यक्तींची मनापासून ची शिल्पे तयार केलेली आहेत.

Babasaheb Purandare

तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दलचा तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा.

About Author

Hello, I am Traveler and i love to write about it.

You might also enjoy: