kumbhe waterfall nearest railway station | kumbhe waterfall distance from mumbai | kumbhe waterfall map | kumbhe waterfall distance | kumbhe waterfall how to reach | kumbhe waterfall best time to visit | pune to kumbhe waterfall | kumbhe waterfall to lonavala distance

मित्रांनो तुम्हाला जर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आवडत असेल तर सह्याद्री एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला गड पर्वत किल्ले आणि यांच्याबरोबरच अद्भुत असे धबधबे पाहायला मिळतात. | Kumbhe Waterfall

अशा ठिकाणी पावसाळ्यामध्ये जाणे म्हणजे एक पर्वणीच असते हे धबधबे इतके सुंदर असतात की त्यांचे शब्दांमध्ये वर्णन करणे शक्यच नाही कारण हे फक्त डोळ्यांनी अनुभवावे लागते.

Kumbhe Waterfall

तर मित्रांनो आज आपण अशाच एका धबधब्या बद्दल माहिती घेणार आहोत ज्याचे नाव आहे कुंभे धबधबा…

मित्रांनो माझ्या ट्रॅव्हल वर आधारित असणाऱ्या ब्लॉगवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुंभे धबधबा आणि कुंभे बोगदा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

कुंभे धबधबा : | Kumbhe Waterfall | Mangaon waterfall

कुंभे या गावातील डोंगराच्या कुशीत लपलेला हा कुंभे धबधबा निसर्गाचा एक अविष्कार म्हणायला हरकत नाही.

हा धबधबा माणगाव येथे असून 178 फूट उंचीवरून खाली पडणाऱ्या या धबधबा चे दृश्य हे तेथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. | Kumbhe Waterfall

फक्त हा धबधबा च सुंदर नसून येथे जाताना येणारे छोटे मोठे पॉईंट सुद्धा खूपच सुंदर आहेत.

मुंबईपासून फक्त चार ते पाच तासांच्या अंतरावर हे ठिकाण असून,

आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुंभे या या ठिकाणाची माहिती मिळणार आहे.

तुमच्यासाठी काही उपयुक्त टिप्स तसेच या ब्लॉगचा वापर तुम्हाला प्रवासासाठी मार्गदर्शन म्हणून होणार आहे.

चला फिरायला… सर्वात उंच ठिकाण. धोडप गड..

इतर माहिती :

कुंभे या नावामध्येच एक विशेषता आहे कुंभ म्हणजेच मातीचे भांडे निसर्गाने या ठिकाणी खूप कुंभा मधून पाणी जे धबधब्याच्या स्वरूपात जमिनीवर पडते आणि हे दृश्य नयनरम्य आहे.

हे पाणी ज्या ठिकाणी पडते ते ठिकाण इतके सुंदर आहे की डोळ्यांचे पारणे फिटते.

कुंभे हे माणगाव मधील एक छोटेसे गाव असून रायगड मध्ये वसलेले आहे तुम्ही येथे गेल्यास अतिशय शांतता आणि

नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तेथील बोगदा सुद्धा फारच पाहण्यासारखा आहे .

तुम्ही तेथे जात असताना गुगल मॅप्स चा जरी उपयोग करणार असाल तरी हा रस्ता फारच गोंधळात टाकणारा आहे,

त्यामुळे तेथे जाता जाता इतर लोकांना म्हणजेच तेथील स्थानिक लोकांना सुद्धा विचारणे गरजेचे आहे.

हा धबधबा आपल्याला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्या मधील  मोठा धबधबा आहे.

मुंबईवरून 153 किलोमीटर तसेच पुण्यावरून 115 किलोमीटर गेल्यावर हा धबधबा आपल्याला बघायला मिळेल.

कसे जाल : | Kumbhe Waterfall | how to reach kumbhe waterfall

 • इथे जाण्यासाठी माणगाव तालुक्या मध्ये जाऊन निजामपूर मध्ये जावे लागेल येथे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कुंभे गाव आहे.
 • तसेच येथे जाण्यासाठी तुम्ही गुगल मॅप चा सुद्धा वापर करू शकता निजामपूर पासून कुंभे धबधबा 13 किलोमीटर असून त्यातील 6 किमी हा घाट वळणाचा रास्ता आहे.
 • इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग करण्याची आवश्यकता पडणार नाही कारण धबधब्यापर्यंत गाडी आरामशीर पोहोचते.
 • तुम्हाला मी सांगू इच्छिते कि येथे जायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे स्वतःची गाडी लागेल.
 • घाट चढल्यानंतर कुंभेगाव येते व तेथूनच या धबधब्याचा व्यू पॉइंट आहे.
 • पावसाळ्यामध्ये जात असाल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवळ दिसेल तसेच छोटे मोठे धबधबे देखील दिसतील  त्यामुळे अशा वातावरणामध्ये फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
 • या घाटातील रस्ता खराब आहे मात्र आजूबाजूचा परिसर अत्यंत हिरवाईने नटलेला असल्यामुळे रस्त्याचे भान राहत नाही.
 • घाट वळणाचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कुंभे टणल येते या टनल ला आतल्या बाजूने सिमेंट प्लास्टर नसल्यामुळे हा थोडा धोकादायक आहे मात्र एक अडवेंचर म्हणून तुम्ही हे करू शकता.
कुंभे | Kumbhe tunnel
 • सुलभ वाहतूक व्हावी म्हणून येथील स्थानिक लोकांनी एका बाजूने जर बोगद्याकडे पाहिले तर दुसरी बाजू एकदम लहान छिद्रा सारखी दिसते.
 • येथे पाहण्यासारखी दोन ठिकाण आहेत एक म्हणजे कुंभे व्ह्यू पॉईंट आणि दुसरा म्हणजे कुंभे वॉटर फॉल.
 • या टनेलच्या पलीकडच्या बाजूस कुंभे धबधबा तुम्हाला दिसेल जिथून धबधब्याचे पाणी खाली पडते,
 • आणि याच्याच बाजूने एक रस्ता आहे जो समोरच्या डोंगरावर जातो आणि तेथून तुम्हाला कुंभे धबधब्याचा व्यू पॉइंट दिसेल.
 • मेन रोड वरून थोडेसे पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक पुल लागेल आणि त्या पुलावरून डाव्या बाजूला गेल्यावर तिथूनच तुम्हाला या धबधब्याचा व्ह्यू पॉइंट दिसेल. इथे पार्किंगला सुद्धा जागा आहे.
 • तसेच तुम्हाला तिथे खाण्यासाठी मक्याचे गरमागरम भाजलेले कणसे सुद्धा भेटतील.
 • पावसाळ्यामध्ये सर्व बाजूला गवत असल्यामुळे तिथे थोडासा चिखल सुद्धा असतो. त्यामुळे कुठेही पाय ठेवताना काळजी घ्या आणि डोंगरांच्या कड्यांपासून थोडेसे लांबच थांबा.

हा अनुभव हा अविस्मरणीय असणार आहे. एन्जॉय करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्र-मैत्रिणींमध्ये मिळून एक सुंदर अशी ट्रीप प्लॅन करून येथे नक्की जा.

शिल्प कलेचा उत्तम नमूना!! पुण्या जवळील हे ठिकाण.

वेगवेगळ्या गावांपासून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी चे अंतर : | Distance

 • पुणे ते कुंभे – 116 किमी
 • मुंबई ते कुंभे मार्गे कोलाड – निजामपूर – १४७ किमी
 • मुंबई ते कुंभे मार्गे माणगाव – निजामपूर – १५८ किमी
 • रत्नागिरी ते कुंभे धबधबा – 218 किमी
 • रायगड किल्ला ते कुंभे धबधबा – 36 किमी

Kumbhe waterfall nearest railway station

 • जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव – कोकण रेल्वे – 26 किमी

महत्त्वाच्या टिपा आणि थोडेसे मार्गदर्शन :

 • कुंभे हे छोटेसे गाव असल्यामुळे येथे जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही.
 • कुंभे घाट चढताना शक्यतो हळूहळू जा कारण रस्ता खराब आहे.
 • धबधब्याला भेट देण्यासाठी दोन रस्ते आहेत एक म्हणजे कोल्हार चा मार्ग आणि दुसरा म्हणजे मॅग्नॉनचा मार्ग यातील कोल्हाड चा मार्ग असल्यामुळे वाईट अनुभव येऊ शकतो.
 • येथून जवळचे ठिकाण म्हणजे रायगड तेथे जाऊन तुम्ही पाचाड जिजामाता शार्कला भेट देऊ शकता, कारण हा रस्ता हा अतिशय निसर्गरम्य आणि बघण्यासारखा आहे.
 • तसेच तुम्हाला किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा हा रस्ता तुम्हाला चांगला आहे.
 • धबधब्यापाशी जेवण्यासाठी किंवा इतर खाण्यासाठी शक्यतो काही नाही मात्र मी तिथे एक मक्याच्या कणसाची गाडी पाहिली होती.
 • पण, तुम्ही निजामपूर किंवा माणगाव येथूनच थोडेफार खायला घेऊ शकता.
 • येथे गेल्यानंतर हिल पॉईंट हा निसरडा आहे, येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेसाठी रेलिंग किंवा भिंत नाही त्यामुळे जास्त लांब किंवा दूर जाऊ नका.

भेट देण्यासाठी आजूबाजूची ठिकाणे : | Kumbhe Waterfall

 • पाचाड जिजामाता वाडा आणि समाधी मंदिर,
 • रायगड किल्ला,
 • मानगड किल्ला,
 • महाड,
 • पाली बल्लाळेश्वर मंदिर
 • देवकुंड धबधबा,
 • श्रीवर्धन सुवर्ण गणपती मंदिर, 
 • प्रतापगड किल्ला.

तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले या गावातील ह्या धबधब्याला पाहायला तुम्ही जाणार का?

आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा…

इतर ठिकाणांच्या माहिती साठि खालील पोस्ट नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा…

शिल्प कलेचा उत्तम नमूना!! पुण्या जवळील हे ठिकाण.

About Author

Hello, I am Traveler and i love to write about it.

You might also enjoy: