Kalsubai Trek, kalsubai trek height, kalsubai trek from pune, kalsubai trek time, kalsubai night trek, kalsubai trek distance, kalsubai height in km, kalsubai in which district, कळसुबाई शिखर कोणत्या तालुक्यात आहे, कळसुबाई शिखर कुठे आहे, कळसुबाई शिखर किती किलोमीटर आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, कळसुबाई ट्रेक, तारामती शिखर उंची, महाराष्ट्रातील शिखरे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते,

Table of Contents

मित्रांनो आज तुम्हाला एका नवीन ठिकाणाबद्दल माहिती आणलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे की भारतामध्ये खूप सुंदर ठिकाणे आहेत तसेच ट्रेकिंग करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे ठिकाणे आहेत. | Kalsubai Trek

महाराष्ट्र हे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सुवर्णभूमी असून जन्म घ्यावा तर महाराष्ट्राच्या मातीतच घ्यावा आणि हे तर भाग्यच.

google maps

ट्रेकिंग करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमधून लोक जात असतात आपल्या भारतामधील बरीच अशी ठिकाणे ही पश्चिम घाटात तसेच हिमालयामध्ये आहेत.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा म्हणजेच आपल्या पश्चिम घाटाचा विचार केला तर सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे कळसुबाई शिखर ट्रेक.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील महाराष्ट्र राज्यातील अतिउंच शिखरांपैकी एक म्हणजे कळसुबाई शिखर हा ट्रेक करण्याचे बरेच लोकांचे स्वप्न असते तर अनेक लोकांसाठी श्रद्धास्थान म्हणून कळसुबाई मंदिर हे या ठिकाणचे वैशिष्ट्य.

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखर ज्याची उंची 5400 फूट म्हणजेच समुद्रसपाटीपासून 1646 मीटर इतकी आहे. म्हणूनच या पर्वताला महाराष्ट्रामधील एव्हरेस्ट असेही म्हटले जाते.

कळसुबाई शिखर सर्व माहिती. | Kalsubai Trek

या शिखरावर चढण्यासाठी चिपातळी ही मध्यम दर्जाची असून भंडारदरा धरणापासून कळसुबाई शिखर हे जवळजवळ सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

कळसुबाई शिखर :

नाव   कळसुबाई शिखर
गावबारी
तालुका, जिल्हा, राज्य.अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र.
ऊंची१६४६ मीटर समुद्रसपाटीपासून (५४०० फूट)
चढण१०८० मीटर
चढाईची श्रेणीमध्यम

कळसुबाई शिखरावर कसे जावे : | Kalsubai Trek How To Go

जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने शिखराला भेट देण्यासाठी जाणार असाल तर भंडारदरा फाट्यावरून भंडारदर्‍याला जाताना भंडारदरा येण्याच्या आधीच सहा किलोमीटर बारी हे गाव आहे.

कळसुबाई शिखरावरील ट्रेकला जाण्यासाठी बारी या गावामधून जावे लागते हे या शिखराचे पायथ्यावरील गाव असून या गावापासून कळसुबाई शिखर हे 6.6 किलोमीटर आहे आणि

हे अंतर चालण्यासाठी जवळजवळ तीन ते चार तास लागतात

पुणे मुंबई नाशिक या ठिकाणांवरून बारी या गावाला येता येते.

मुंबई ते कळसूबाई 156 किमी पुणे ते कळसूबाई 170 किमी

नाशिक ते कळसुबाई 60 किमी

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी येथून बारी गाव अंतर जवळजवळ 40 किलोमीटर 

तिथे जाण्यासाठी फक्त एक ते दोन बस असतात त्यामुळे एखादी गाडी करून जाणे योग्य.

कळसुबाई या शिखरावरून सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील सुंदर अशी शिखरे, हरिश्चंद्रगड, रतनगड, अशी ठिकाणे पाहता येतात.

तसेच या ट्रेकमध्ये जंगल वेगवेगळे धबधबे गवताळ प्रदेश तसेच ऐतिहासिक किल्ले हे या नैसर्गिक वातावरणामुळे फारच सुंदर दिसतात.

या ठिकाणाला भेट देण्यासाठीचा चांगला काळ म्हणजे जून – जुलै – ऑगस्ट कारण पावसाळ्यामध्ये डोंगररांगा आणि पर्वते यांचे सौंदर्य काही वेगळेच असते.

नाईट कॅम्पिंग : | Kalsubai Trek night camping | kalsubai night trek

साठी जाणार असाल तर उन्हाळ्यात म्हणजेच फेब्रुवारी ते मेदरम्यान तुम्ही नाईट कॅम्पिंग ट्रेकिंग साठी जाऊ शकता. हा कॅम्पिंग साठी सर्वोत्तम काळ आहे.

तसेच या काळामध्ये हवामान स्वच्छ असल्यामुळे तुम्ही तुमच्या समोर ढग उडताना सुद्धा पाहू शकता.

कळसुबाई हे नाव कसे पडले : | Kalsubai Trek

या गावाची एक अशी आख्यायिका आहे की कळसुबाई ही या गावातील सून होती.

तिला औषधी वनस्पती यांच्या बद्दल खूप सारे ज्ञान होते.

लोकांची सेवा करण्यासाठी तसेच शेळ्या मेंढ्या गुरे वासरे यांचा औषधोपचार करण्यासाठी या वनस्पतीच्या सहाय्याने औषधे बनवून ती वापर करत असे.

थोड्या दिवसानंतर कळसुबाई चा मृत्यू झाल्यामुळे  तिच्या स्मरणार्थ गावकऱ्यांनी या डोंगरावर एक छोटेसे मंदिर स्थापन केले आणि या शिखराला कळसूबाई असे नाव दिले.

गावातील ग्रामस्थ आणि स्थानिकांकडून या मंदिरामध्ये रोज पूजा केली जाते तसेच दर मंगळवारी आणि गुरुवारी येथे आरती सुद्धा केली जाते.

या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव हा खूप जल्लोषात आणि थाटामाटात साजरा केला जातो.

कळसुबाई शिखराचे पर्यावरण / वातावरण : | Kalsubai Trek

भंडारदर्‍यातील अभयारण्य  हद्दी मध्ये कळसुबाई शिखर हे येत असल्या कारणामुळे हा संपूर्ण परिसर हा संरक्षित असा समजला जातो.

टेकड्यांच्या सर्व बाजूने असलेल्या जंगलांमध्ये वेगवेगळे कीटक, साप, तसेच पशु आणि पक्षी आहेत.

वेगवेगळ्या प्रकारचे सरडे, फुलपाखरे, मॉथ, कीटक आहेत.

तसेच पावसाळ्यानंतर संपूर्ण परिसर वेगवेगळ्या फुलांनी, पक्षांनी बहरलेल्या असल्या कारणाने येथे पक्षी निरीक्षक आणि पर्यावरण प्रेमी या ठिकाणाला भेट देतच असतात.

शिल्प कलेचा उत्तम नमूना!! पुण्या जवळील हे ठिकाण.

कळसुबाई शिखराची भौगोलिक रचना : | Kalsubai Trek

सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगांमध्ये कळसुबाई शिखर येते त्याच्या आजूबाजूला छोट्या छोट्या पर्वतरांगा पश्चिमे दिसेपर्यंत पसरलेल्या असून पश्चिम घाटामध्ये या सर्व टेकड्या शामिल होतात.

आजूबाजूचे सर्व डोंगररांगा आणि टेकड्या यांना मिळून या दक्षिण घाटाची नैसर्गिकरित्या सीमा तयार होते.

पूर्वीच्या काळामध्ये लाखो वर्षांपूर्वी जमिनीतील भूगर्भीय हालचालीं द्वारे या संपूर्ण सह्याद्री पर्वत रांगांची निर्मिती झाली.

त्यावेळी जी उंच उंच पर्वते आणि शिखरे निर्माण झाली त्यातील सर्वात उंच आणि सुंदर शिखर म्हणजेच कळसुबाई शिखर होय.

पश्चिम घाटामध्ये खूप प्रमाणात आढळणाऱ्या बेसॉल्ट खडक यांनी हे शिखर बनलेले आहे.

कळसुबाई शिखर ट्रेक असे जा : | Kalsubai Trek

तुम्हाला जर पुण्यावरून कळसुबाई शिखरला जायचे असेल तर तुम्हाला आधी बारी या गावात पोहोचावे लागेल

बारी या गावाच्या पायथ्यापासूनच कळसुबाई शिखर ट्रेक चालू होतो.

पुण्यावरून बारी ला जाण्यासाठी तुम्हाला NH 60  मार्गे ओतूर वरून राजुर आणि मग भंडारदरा असे जावे लागेल.

याकरिता तुम्हाला जवळजवळ पाच ते सहा तास लागू शकतात.

पहाटे लवकर घरामधून निघा.

तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ट्रेक साठी चालत आहात तुमच्या चालण्याचा वेग आणि मध्ये घेतलेली विश्रांती त्यावरच तुम्हाला ट्रेक करण्यासाठी किती वेळ लागेल हे ठरेल.

ट्रेक साठी तुम्हाला अंदाजे 3 ते 4 तास लागतील .

या ट्रेक साठीची चढाई ही मध्यम दरवाजाची असून भारी या गावातून अंदाजे 900 मीटर उंच इतकी आहे.

भंडारदरा धरणापासून सहा किलोमीटर अंतरावर कळसुबाई शिखर असल्या कारणामुळे तुम्ही दोन ते तीन दिवस सुट्टी काढून इतर ठिकाणी सुद्धा फिरू शकता.

जसे की भंडारदरा धरण येथे दोन दिवस मुक्काम करून रांधा धबधबा, कोकणकडा, तसेच कळसुबाई शिखर ही ठिकाणे तुम्हाला येथे पाहता येतील.

चला फिरायला… सर्वात उंच ठिकाण. धोडप गड..

कळसुबाई शिखर ट्रेक : Kalsubai Shikhar Trek

हे शिखर म्हणजे हौशी पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे हा ट्रेक जवळजवळ सात किलोमीटरचा आहे.

बारी गावापासून या ट्रिप ची सुरुवात होते आणि शिखराची चढाई करून मागे येऊन हा ट्रेक संपवता येतो.

हे शिखर चढणाऱ्यांपैकी 90% ट्रेकर्स हे कळसुबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात बारी गावाच्या डोंगराच्या दिशेने आणि पूर्वेकडून हे दोन्ही मार्ग ट्रेकिंग साठी आहेत .

या ठिकाणी पावसाळ्यात गेल्यास छोटे मोठे धबधबे सुंदर पठारे व डोंगर हे सर्व हिरवे गार झालेले दिसते

या शिखरावर चढण्यासाठी पायऱ्या असल्यामुळे चढण्यासाठी जास्त कठीण नसून मध्यम स्वरूपामध्ये चढाई करता येते.

बाजूलाच असणाऱ्या ओढ्यापासून थोडे पुढे गेल्यास एक मारुती मंदिर आहे ही एक खूण असून ट्रेक करण्यासाठी जाताना आणि परत येताना या मंदिरापाशी आराम करू शकता.

या शिखरावर ट्रेकिंग करताना आपल्याला प्रवरा नदीची उपनदी हे उत्तर दिशेला उतारावर उगम पावताना दिसते तसेच कृष्णा नदीचे सुद्धा दृश्य या ट्रेकिंग दरम्यान दिसते.

कळसुबाई शिखरला भेट देणाऱ्या ट्रेकर्स आणि पर्यटक यांच्या संख्या लक्षात घेऊन या शिखराच्या उतारावर पायऱ्या आणि लोखंडी रेलिंग बांधलेले असल्यामुळे शिखरावर चढताना जास्त त्रास होत नाही.

मारुती मंदिराच्या पाठीमागून जाणारा रस्ता हा शिखरावर जातो मात्र दिसायला सोपा वाटत असला तरी तेथून जाताना छोट्या-मोठ्या दऱ्या आणि खडकाळ प्रदेश असल्याकारणाने ट्रेकिंग करताना हळूहळू आणि सांभाळून ट्रेक केला तर योग्य राहील.

बारी गावाच्या पायथ्याला म्हणजेच जिथून हा ट्रेक चालू होतो तिथे सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या असून त्या पावसाळ्यामध्ये निसरड्या होतात त्यामुळे ह्या पायऱ्या चढताना काळजी घेतलेली चांगली.

अद्भुत असा कुंभे धबधबा…

सुरक्षिततेसाठी सूचना

मित्रांनो ट्रेकिंग करण्याच्या वेळी तेथे कोणत्याही प्रकारची पोलीस सुरक्षा उपलब्ध नसून जीव रक्षक ही उपलब्ध नसतात त्यामुळे सुरक्षित रित्या ट्रेकिंग करा.  

ह्या ट्रेकिंग साठी शक्यतो लहान मुलांना घेऊन जाऊ नका तसेच ज्यांना दम्याचा त्रास होत आहे त्यांनी न गेलेलेच चांगले.

ट्रेकिंग करताना ग्रुप मध्ये राहून ट्रेकिंग करा.

हँग आऊट साठी किंवा एकट्याने ट्रेकिंग करायचे असेल तर यासाठी हे ठिकाण सुरक्षित नाही.

ट्रेकिंग साठी इतर सूचना.

या ट्रेक साठी तुम्ही जर उन्हाळ्यात जात असाल तर सन स्क्रीन जरूर वापरा

उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोपीचा वापर करा म्हणजे जास्ती ऊन लागणार नाही

ट्रेकिंग करायची असेल तर प्रत्येक वेळी दोन पूल चा वापर करा.

चपला पेक्षा बूट असे वापरा जे  घसरणारे नसतील किंवा ज्यांना ग्रीप असेल.

शिखरावर पाहण्यासारखी ठिकाणे :

ट्रेकर्स बेस स्टॉप : ज्या पर्यटकांना शिखरावर चढता येणार नाहीत त्यांच्यासाठी हे शिखर चढायला सुरुवात केल्यास पहिल्याच टप्प्यावर हे ठिकाण लागते हे पर्यटकांच्या सोयीसाठी बांधलेल्या असून येथे  आराम करू शकता.

कोरलेली कळसूबाईची पाऊले : सुरुवात केल्यानंतर थोडेसे पुढे गेल्यास दुसऱ्या पायरीवरच कातळामध्ये दोन पाऊले कोरलेली असून ती कळसुबाईची आहेत. गावकऱ्यांची ही श्रद्धा असून शेवटच्या पायरीच्या खाली बाजूला एक पत्र्याची शेड आणि विहीर सुद्धा आहे.

कळसुबाई मंदिर : शिखराच्या शेवटी वर टोकावर कळसूबाईचे एक छोटेसे मंदिर असून या मंदिरामध्ये तीन माणसे बसतील एवढीच जागा आहे.

देवकुंड धबधबा 2023, सर्व माहिती.

कळसुबाई शिखरा जवळील हॉटेल आणि रिसॉर्ट :

  • येथे विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स असून जेवण्याची आणि राहण्याची सुद्धा सोय ह्या हॉटेल्स मध्ये होईल. कळसुबाई हॉटेल आणि रेस्टॉरंट हॉटेल ट्रेकर्स कट्टा आनंदवन रिसॉर्ट इ.
  • तसेच तुम्ही जर एमटीडीसी भंडारदरा येथे राहिला तर तुम्ही तेथील इतर ठिकाणे सुद्धा पाहू शकता.

कळसुबाई शिखरा जवळील इतर पाहण्यासारखी ठिकाणे.

भंडारदरा अभयारण्य

विविध प्रकारच्या वनस्पती या भंडार्यातील अभयारण्यामध्ये असून एवढ्या प्रकारच्या वनस्पती इतर कोणत्याही अभयारण्यात दिसणार नाहीत तसेच येथे धायटी उक्षी मदवेल हेकळ पांगळी कुडा गारवेल पानफुटी करवंद अशा प्रकारच्या विविध वनस्पती असून जंगलातील विविध प्राणी म्हणजेच बिबट्या रानडुकरे रान मांजरे भेकर तरस कोल्हे हे सुद्धा या अभयारण्यामध्ये दिसतात

भंडारदरा.

महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांपैकी भंडारदरा हे सुद्धा एक आहे या भंडारदर्‍यात धबधबे नैसर्गिक सौंदर्य हिरवळ पर्वते स्वच्छ हवा आणि निसर्गरम्य वातावरण या परिसरामध्ये दिसते तुम्हाला जर भंडारदर्‍याला भेट द्यायचे असेल तर यासाठीचा सर्वात चांगला काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी तसेच भंडारदर्‍यातील धरण हे दगडी बांधकामात बांधलेले असल्यामुळे 82 मीटर इतक्या उंच असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.

Bhandardara umbrela waterfalls

या धरणातून जेव्हा पाणी नदीपात्रामध्ये सोडतात तेव्हा जवळजवळ 200 फुटांवरून हे पाणी नदीपात्रात पडते हे पहायला अतिशय सुंदर दिसते तसेच हे पाणी पडत असणाऱ्या धबधब्याला अम्ब्रेला फॉल असेही म्हणतात कारण ते छत्रीच्या आकारासारखे नदीपात्रात पडत असते.

हे पाणी वाऱ्यामुळे इतके लांब पर्यंत जाते की इथे येणारे पर्यटक सुद्धा हे पाणी पाहताना भिजून जातात.

 या धरणाचे उद्घाटन हे लेस्ली  वेलस्ली यांच्या हस्ते दहा डिसेंबर 1926 साली झाले होते.

त्या काळामध्ये या धरणाच्या पाणी साठ्याला ऑर्थर लेक असे नाव देण्यात आले होते तर धरणाला विल्सन डॅम असे म्हटले जात होते.

सांधन व्हॅली

अनेक वर्षांपूर्वी म्हणजेच प्राचीन काळामध्ये जमिनीला एक मोठी भेग पडल्यामुळे ही सांधण व्हॅली किंवा घळ पडली होती. ही व्हॅली निसर्गाच्या एका चमत्कारासारखीच आहे तसेच ही दरी जवळ जवळ दोनशे ते चारशे फूट खोल आणि चार किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे पावसाळ्यामध्ये तुम्हाला या सांधण दरीला जाणे अशक्य आहे पावसाचं पाणी याच दरीतून खाली कोसळल्यामुळे येथे जाता येत नाही. येथे जाण्यासाठी चा सर्वोत्तम काळ म्हणजे उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ऊन सावल्यांचा खेळ सुद्धा पाहता येईल.

sandhan vally

केदारेश्वर गुहा

हरिश्चंद्रगडावर फिरायला गेल्यास तुम्हाला येथे ही गुहा दिसेल. हे एक महादेवाचे पवित्र स्थान आहे. या गुहेमध्ये महादेवाचे फार मोठे एक शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या बाजूने असे सुद्धा म्हणले जाते की हे चार खांब म्हणजे चार युगे आहेत यातील तीन खांब हे पडलेले असून फक्त एकच खांब तिथे राहिलेला आहे त्यामुळे हा चौथा खांब कलियुगाचा असून हा खांब पडल्यास आता जे कलियुग चालू आहे त्या कलियुगाचा अंत होईल.

kedareshwar guha

या गुहेमध्ये कोणत्याही महिन्यात किंवा कोणत्याही ऋतूमध्ये गेलात तरी पाणी असते त्यामुळे खूप पर्यटक येथे दरवर्षी भेट देण्यासाठी येतात.

ट्रेकर्सची पंढरी म्हणून या ठिकाणाला ओळखलं जात असून या गुहेला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

हरिश्चंद्रगड भंडारदर्‍यापासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर हरिश्चंद्रगड आहे तसेच मुंबईपासून 218 किलोमीटर आणि पुण्यापासून 166 किलोमीटर आंतर असून अहमदनगर जिल्ह्यामधील हरिश्चंद्रगड हा एक ऐतिहासिक गड मानला जातो.

या गडाची उंची ही समुद्रसपाटीपासून 1424 मीटर आहे.

ठाणे नगर आणि पुणे या जिल्ह्यांच्या सीमारेषेवर हरिश्चंद्रगड येत असून या ठिकाणी जाण्यासाठी 8 रस्ते आहेत.

या गडावर जाण्यासाठी पाचनई, माकडनाळ, नळीची वाट, जुन्नर दरवाजा, टोलार खिंड, खिरेश्वर हे मार्ग जातात.

गडावर पाहण्यासारखी बरेच ठिकाणे असून कोंकण कडा, तारामती शिखर, गणेश गुहा, केदारेश्वर गुहा, पुष्करणी आणि अजूनही ठिकाणे आहेत.

C या आकाराच्या कोकणकड्यामुळे या भागाला महत्त्व प्राप्त झालेले असून पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य फारच सुंदर असते.

रतनगड

रतनगड हा 4250 फूट इतक्या उंचीवर असून जवळ जवळ 400 वर्ष जुना हा गड आहे मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड वापरला असून या किल्ल्याला चार दरवाजे आहेत. या दरवाजांची नावे म्हणजे कोकण त्र्यंबक हनुमान आणि गणेश.

rataangadh flowers

रतनगडावर मोठमोठे जलाशय, डोंगर, उंच शिखरे, घनदाट जंगल, धबधबे, कोकण कडे, कात्राबाईची खिंड, सांधण दरी तसेच तेथून दिसणारा हरिश्चंद्रगड, पाबर गड, आजोबाचा डोंगर, अलंग -मलंग, प्रवरा नदी तसेच जून महिन्यातला काजवा महोत्सव हे पाहणे म्हणजे एक पर्वणी च आहे.

येथे फारच सुंदर आशा प्रकारची फुले असतात आणि ती पाहण्यासाठी पर्यटक लांबून येतात.

अंतर : kalsubai trek from pune, Distance

  • पुणे मुंबई नाशिक या ठिकाणांवरून बारी या गावाला येता येते.
  • मुंबई ते कळसूबाई 156 किमी पुणे ते कळसूबाई 170 किमी
  • नाशिक ते कळसुबाई 60 किमी
  • सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी येथून बारी गाव अंतर जवळजवळ 40 किलोमीटर 

FAQ

कळसुबाई ट्रेक साठी कोणत्या गावात जावे लागते?

कळसुबाई ट्रेक साठी बारी या गावांमध्ये जावे लागेल.

कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी चांगला वेळ कोणता?

पावसाळ्यात जाणारा असाल तर जुलै ते सप्टेंबर थंडीत जाणारा असाल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी आणि नाईट ट्रेक करायचा असेल तर फेब्रुवारी ते मे या उन्हाळ्याच्या काळात तुम्ही जाऊ शकता.

कळसुबाई ला जाण्यासाठी कोणत्या घाटातून जावे लागते?

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई ठिकाण हे पश्चिम घाटामध्ये आहे

About Author

Hello, I am Traveler and i love to write about it.

You might also enjoy: