मित्रांनो तुम्हाला जर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आवडत असेल तर सह्याद्री एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला गड, पर्वत. किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे पाहायला मिळतात. तर आज आपण पाहणार आहोत धोडप गड Dhodap Gad बद्दल माहिती.

मित्रांनो, सह्याद्री मधील दोन नंबरचा म्हणजेच सेकंड हायेस्ट किल्ला आणि महाराष्ट्रातील पाचव्या नंबरचे सर्वात उंच ठिकाण म्हणजेच हे आहे नाशिकचे सर्वात फेमस ठिकाण धोडप गड.

धोडप गड हा नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि कळवण या दोन तालुक्यांच्या मध्ये स्थित आहे.

Nashik to Dhodap fort distance

नाशिक पासून जवळ जवळ 70 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.

Dhodap Gadh

धोडप गड Dhodap Gad किल्ला बद्दल माहिती : | What is the history of dhodap fort? | When was Dhodap fort built?

 • धोडप गड या किल्ल्याला इतरही नावे आहेत धुडप, धरब, धारब.
 • तसेच या किल्ल्याची उंची 1451 मीटर आणि फुटांमध्ये 4959 आहे.
 • किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून हा अजिंठा सातमाळा डोंगर रांगांमध्ये येतो.
 • धोडप गड या किल्ल्याची स्थापना 1046 मध्ये झालेली आहे.
 • हा किल्ला 945 हेक्टर एवढ्या परिसरात पसरलेला आहे
 • हा शिवलिंगाप्रमाणे दिसणारा ऐतिहासिक अशा प्रकारचा किल्ला आहे.

Dhodap Gad धोडप गडावर कसे जाल?

 • तुम्हाला जर या किल्ल्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट ने जायचं असेल तर तुम्हाला आधी नाशिकला येऊन नाशिक मधून एसटी करावी लागेल.
 • वादळी भुई फाट्यावरून तुम्हाला धोडंबे गावाला तुम्हाला एसटी बस भेटून जाईल एसटी बस येथे थोड्या फारच जातात.
 • धोडंबे गावावरून तुम्हाला हट्टी गावाला किंवा कुंडाने गावाला पोहोचावे लागेल जे धोडंबे गावापासून सात किलोमीटर अंतरावर आहे.
 • या गावांना जाण्यासाठी तुम्ही टेम्पो किंवा इतर वाहनांचा सुद्धा वापर करू शकता.

Dhodap Gad धोडप गडावर कुठून ट्रेकिंग चालू कराल? | What is the difficulty level of dhodap fort? | Dhodap fort trek

 • बरेच लोक हट्टी गावावरून या ट्रेकला स्टार्ट करतात.
 • मात्र कुंडाने गावावरून हा किल्ला जवळ असल्यामुळे आपण येथून देखील जाऊ शकतो.
 • उन्हाळ्यात जर तुम्ही या ठिकाणी जाणारा असेल तर तुमच्याजवळ पाण्याचे प्रमाण जास्त ठेवा कारण चालणे जास्त असल्यामुळे तुम्हाला पाण्याची फार आवश्यकता लागणार आहे .
 • तुमच्याकडे जर गाडी असेल आणि तुम्हाला ट्रेकिंग करायचे नसेल तुम्ही डायरेक्ट गाडीने सुद्धा या डोंगराच्या वरपर्यंत जाऊ शकतात. तिथून सुद्धा तुम्ही ट्रेकिंगची सुरुवात करू शकता.
 • इथे तुम्हाला नवनाथ महाराजांचे मंदिर सुद्धा दिसेल आणि त्याच्या पाठीमागे इकारा शिखर आणि त्याच्या पाठीमागे कंचना किल्ला सुद्धा दिसेल.

देवकुंड धबधबा 2023, सर्व माहिती.

Dhodap Gad धोडप गड वरील पाण्याची सोय :

 • या मंदिराच्या इथेच तुम्हाला पाणी देखील भेटेल आणि महत्त्वाचे म्हणजे इथे पाण्याचा सोर्स देखील आहे.
 • येथे जुन्या पाण्या ची विहिर तेही खूप छान कन्स्ट्रक्शन मध्ये बनवलेल्या,
  तसेच विविध प्रजातींचे साप पाहायला मिळतील.
 • धोडप गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेला किल्ला आहे या किल्ल्याचे महत्व आपल्याला पेशव्यांच्या दरम्यान फारच दिसून येते.

धोडप गड किल्ल्याचे महत्व : Dhodap fort information in marathi

पेशवाईच्या वेळी हा किल्ला एक कारावास किंवा जेल म्हणून उपयोगामध्ये आणला जात होता.

हा किल्ला उंच असल्याकारणामुळे आसपासच्या जागांवर आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग होत होता. येथे गेल्यावर पहिलाच बुरूज चांगल्या अवस्थेत आढळून येईल.

धोडप गड वरील तटबंदी :

 • येथील तटबंदी ही चांगल्या अवस्थेत नसली तरीही आपल्याला व्यवस्थित पाहता येते.
 • या किल्ल्यावरून खिडक्या ह्या निरीक्षणासाठी तसेच छोटे छोटे खिडक्या केलेल्या आहेत त्या गरम पाणी किंवा तेल ओतण्यासाठी उपयोगात आणल्या जात होत्या.
 • कारण बुरुजांवरून कोणी आलं किंवा गडावर जर हल्ला झाला तर येथूनच त्यांच्यावर हल्ला केला जात होता.
 • बुरुजावरून थोडे पुढे गेल्यास तुम्हाला तिथे एक माची दिसेल तिथे पाण्याचे छोटेसे तळे आहे मात्र येथील पाणी तुम्ही पिऊ शकत नाही.

अद्भुत असा कुंभे धबधबा…

धोडप गड किल्ल्यावरील मंदिरे :

 • हिंदू मंदिरांमध्ये तुम्हाला मारुती च्या विविध प्रकारच्या मुर्त्या पाहायला मिळतात मात्र, महाराष्ट्राच्या गडांवर किंवा किल्ल्यांवर तुम्हाला एकच प्रकारचे मारुतीराया पाहायला मिळतील ते म्हणजे वीर मारुती.
 • या रूपामध्ये ते निडर आणि शूर दिसतील. या रूपामध्ये मारुतीरायांचे शेपटी ही त्यांच्या डोक्याच्या वरून असते आणि उजवा हात वरती केलेला असतो.
 • म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्या च्या वरती या वीर मारुतीचे मंदिर पाहायला मिळेल.

धोडप गड वरील परिसर :

 • मंदिरापासून पुढे गेल्यावर तुम्हाला महादरवाजा पाहायला मिळेल.
 • येथे 12- 13 फुटांचे मोठमोठाले खड्डे आणि त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे,
 • रात्रीच्या वेळी जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर सावधानीने करा आणि तुमच्याजवळ हेड टॉर्च आणि इतर साहित्य असू द्या .
 • इथून पुढे खाली गेल्यानंतर तुम्हाला पेशवे कालीन विहीर दिसेल.
 • या विहिरीला खूपच छान पद्धतीने बांधले गेलेले आहे. हे पेशवे कालीन असून हा गड जेव्हा हिंदवी स्वराज्यामध्ये आला तेव्हा ही विहीर बांधली गेली आहे.
 • या विहिरीला बारा महिने पाणी असते मात्र या विहिरीचे पाणी पिण्या लायकीचे राहिलेले नाही .
 • इथे तुम्ही नाईट ट्रेकिंग करणारा असेल तर येथे तुम्हाला साप सुद्धा पाहायला मिळतील.

धोडप गड वरील पाहण्यासारखी ठिकाणे :

या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर येथून तुम्हाला सप्तशृंगी, अचला, कन्हेरा, अहीवंतगड, खळ्याजवळ्या, साडेतीन रोडगा, कांचन, इंद्राई, राजदेहेट, चांदवड, विखारा, मंचन या सातमाळा पाहायला मिळतील.

तसेच या किल्ल्याची उंची जास्त असल्यामुळे या किल्ल्यावरून तुम्हाला जवळजवळ 25 किल्ले दिसतात.

शिल्प कलेचा उत्तम नमूना!! पुण्या जवळील हे ठिकाण.

धोडप गड चा इतिहास :

हा किल्ला मुघल सरकाराच्या स्वाधीनते मध्ये सुरुवातीला होता.

त्यानंतर तो मराठ्यांच्या हाती गेला, व मराठ्यांनी या किल्ल्याला नाशिकच्या महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये स्थान दिले.

त्यानंतर 1818 मध्ये या किल्ल्यावर इंग्रज अधिकारी ब्रिग्स यांनी मराठ्यांवर आक्रमण केले. आणि या किल्ल्यावर त्यांनी लढाई जिंकली.

धोडप गड ला भेट देण्याची वेळ :

या किल्ल्यावर जाण्यासाठी ची सर्वोत्तम वेळ हिवाळा आहे. या किल्ल्याची ऊंची जास्त असल्यामुळे जाताना गरम कपडे घेऊन जा नाहीतर थंडी वाजेल.

तसे तर तुम्ही उन्हाळ्यात देखील जाऊ शकता मात्र पावसाळ्यात जर गेला तर या ठिकाणी चढण्यासाठी कठीण होईल कारण निसरड्या पायवाटांमुळे चढणे कठीण होऊ शकते.

धोडप गड वरील राहण्या साठी जागा :

या किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत तसेच येथे जेवण्याची सोय नाही त्यामुळे येथे जाताना खाण्याचे सामान सोबत घेऊन जाणे योग्य राहील.

तुम्ही टेन्ट टाकून राहू शकतात. तसेच या गुहेमध्ये पाणी सुद्धा आहे आणि एक देवीचे मंदिर सुद्धा आहे.

इथून समोरच्या कड्यावर गेल्यास तुम्हाला येथे गुहा तसेच वाडा दिसेल येथे विविध पाण्याच्या टाक्या आहेत मात्र यांचे पाणी पिण्या योग्य नाही.

या किल्ल्याच्या संपूर्ण दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला महादरवाजा दिसेल.

google maps

तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

About Author

Hello, I am Traveler and i love to write about it.

You might also enjoy: