how to reach devkund waterfall | devkund waterfall district | devkund waterfall is open or not | devkund waterfall nearest railway station | lonavala to devkund waterfall | devkund waterfall is open or not in 2023 | devkund waterfall location in maharashtra | devkund waterfall from mumbai by train | Devkund Waterfall

मित्रांनो तुम्हाला ह्या सुंदर वातावरणामध्ये एक दिवसाची ट्रिप काढायची असेल तर तुम्ही देवकुंड धबधबा या ठिकाणी जाऊ शकता. | Devkund Waterfall

पुण्यापासून जवळच असलेला हा धबधबा सोशल मीडियावर फारच गाजलेला आहे त्यामुळेच या धबधब्याची तरुणाईला सुद्धा भुरळ पडलेली आहे.

देवकुंड धबधब्याबद्दल थोडेसे | Devkund Waterfall

महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यामध्ये तालुक्याच्या दक्षिण दिशेला पाटणूस गावाची ग्रामपंचायत आहे. याच गावाच्या हद्दीमध्ये भिरा नावाच्या गावाजवळ देवकुंड धबधबा आहे.

भिरा गावात पोहोचल्यावर जवळजवळ दीड ते दोन तासांच्या ट्रेक नंतर देवकुंड धबधब्यावर पोहोचतो व येथे पोहोचण्यासाठी जवळजवळ आठ किलोमीटर अंतर चालावे लागते.

कुंडलिका नदीचा उगम म्हणजे हा धबधबा असून तीन धबधबे यांचा संगम म्हणजेच देवकुंड धबधबा असे मानले जाते होय.

हा धबधबा ज्या ठिकाणी पडतो तो एक प्रकारचा खडक असून तेथे खूप प्रमाणात पाणी साचते.

काही लोक देवकुंड धबधब्याला देवांचे खास ठिकाण असे मानतात, तुम्हाला जर छोटीशी पिकनिक काढायची असेल तर हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. | Devkund Waterfall

देवकुंड धबधबा हा निसर्गाचा एक चमत्कार. पूर्वीच्या काळामध्ये एका मोठ्या अजगराने कात टाकल्या सारखा हा दिसतो.

या धबधब्याची उंची ही 2,700 फूट असून या सर्व भागाला डोंगराळ प्रदेशाने वेढल्यामुळे फारच सुंदर वातावरण तयार होते.

शिल्प कलेचा उत्तम नमूना!! पुण्या जवळील हे ठिकाण.

भौगोलिक ठिकाणे : | Devkund Waterfall

हा धबधबा धरणाच्या पश्चिम दक्षिण दिशेला असून पूर्वेच्या बाजूला पुणे पश्चिम दिशेला कोलाड आणि उत्तर दिशेला लोणावळा या प्रकारे या ठिकाण ची भौगोलिक स्थिती आहे.

परिसराचे हवामान : | Devkund Waterfall

धबधब्याच्या ठिकाणी हवामान हे उष्ण आणि दमट प्रकारचे आहे कोकण पट्ट्यात हे ठिकाणी येत असल्यामुळे येथे भरपूर पाऊस पडतो.

Devkund Waterfall

भिरा – देवकुंड ट्रेक : Bhira – Devkund Treak

 • देवकुंड धबधब्या पर्यंत जाण्यासाठी पर्यटकांचा सर्वात आवडता मार्ग म्हणजे भिरा या गावामधून साडेचार किलोमीटरचा ट्रेक या ट्रेकिंगच्या दरम्यान फोटोग्राफी हे फारच सुंदर करता येते तसेच ट्रेकिंग सुद्धा छान होते.
 • देवकुंड भिरा ट्रेकिंगला जर तुम्हाला जायचे असेल तर फिटनेस ची फार गरज आहे.
 • पावसाळ्यामध्ये धबधबे हे फिरण्यासाठी चे सर्वोत्तम ठिकाण असून पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवळ पाहता येते.
 • जेव्हापासून सोशल मीडियावर हा देवकुंड धबधबा व्हायरल झालेला आहे तेव्हापासून हे खूपच गजबजलेले आणि धोकादायक असे ठिकाण बनले आहे.
 • या धरणाच्या जंगलामधून आणि बॅकवॉटर असल्या कारणामुळे धरणाच्या पायथ्याला ट्रेकिंग करावा लागतो तसेच हे ट्रेकिंग करताना ट्रेकिंगचा बराच भाग अर्ध्या वाळलेल्या जंगलातून जातो काही वेळा नदीचे पाणी सुद्धा रस्त्यावरून जाते.
 • आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे येथे जाताना एक गाईड अवश्य घ्या.

कसे जाल : Devkund waterfall location in Maharashtra

पुण्यातील चांदणी चौकातून पिरंगुट पौड- माले- मुळशी- चाचवली – वारक- निवे सारोळे – ताम्हिणी घाट उतरल्यानंतर विळे भागाड या नावाचा एम. आय. डीसी. येतो, विळे भागाड येथून पाली रस्त्यावरुन जवळजवळ ९ कि.मी. गेल्यानंतर भिरा गावात पोहचता येते.

गावात पोहोचल्यानंतर येथील ग्रामस्थांनी गाडी पार्किंगची व्यवस्था केलेली असून पार्किंगचा खर्च 30 रुपये आहे

तसेच प्रत्येक पर्यटका कडून प्रत्येकी 10 रुपये असा प्रवेश कर घेण्यात येतो.

गाईड :

गावातीलच स्थानिक तरुण हे पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे गाईडचे काम करतात.

ट्रेकिंग हे जंगलामधून असल्यामुळे जर जंगलामध्ये तुम्हाला काही दुखापत झाली किंवा एखादा कीटक वगैरे चावला, तर या गाईड कडे त्यासाठीचे नैसर्गिक उपाय असतात.

ट्रेकिंग करताना काय काय करावे व काय करू नये याच्या सूचना गाईड वारंवार देत असतात.

धबधब्यावरील पाण्यात किती फुटापर्यंत जायचे व कोणत्या दिशेने जायचे हे सुद्धा गाईड सांगतात.

अद्भुत असा कुंभे धबधबा…

पर्यटन स्थळी जाण्यासाठी चे अंतर :

पुण्यापासून 110 किमी.

मुंबई पासून 170 किमी.

लोणावळ्यापासून 52 किमी.

जवळचे एअरपोर्ट : Devkund Waterfall nearest Airport

पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट

जवळचे रेल्वे स्टेशन : Devkund Waterfall nearest railway station

कोकण रेल्वे – माणगाव रेल्वे स्टेशन 30 किमी.
मध्य रेल्वे – लोणावळा रेल्वे स्टेशन 82 किमी.

टिप्स :

येथे ट्रेकिंग करण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे तुमच्याकडे थोडेसे खाद्यपदार्थ सुद्धा ठेवा.

या ठिकाणी हॉटेल्स, निवास सुविधा, रिव्हर साईड कॅम्पिंग, रुग्णालय, पोलीस स्टेशन व रिसॉर्ट आहेत.

धबधब्याला भेट देण्याची वेळ : Devkund waterfall is open or not in 2023 ; What is the best time to visit Devkund?

 • हा धबधबा बघण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे सप्टेंबर महिन्याचा शेवट आणि ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंतचा काळ.
 • पावसाळा संपल्यामुळे या महिन्यांमध्ये चांगले हवामान असते.
 • पावसाळ्यामध्ये डोंगरांमधील पाण्याचे प्रमाण हे अचानक वाढले तर धबधबा पाहणे असुरक्षित होऊन जाते, तसेच अपघाताचे प्रमाण वाढते म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो हा धबधबा पाहायला जाऊच नये.

सुरक्षिततेसाठी टिप्स : Is Devkund safe for kids?

 • ट्रेकिंग करायचे असल्यामुळे कमीत कमी चार तास चालण्याची तयारी असणे आवश्यक आहे तरच या ट्रेकिंगला जा.
 • धबधबा पाहण्यासाठी शक्यतो लहान मुलांना नेऊ नये.
 • ट्रेकिंगचा वेळ जास्त असल्यामुळे पोहोचल्यानंतर भूक लागू शकते म्हणून सोबत खाण्यासाठी काहीतरी पदार्थ ठेवा.
 • येथे जाताना तुम्ही जी चप्पल किंवा शूज घालणारा हा त्याला ग्रीप असणे आवश्यक आहे

चला फिरायला… सर्वात उंच ठिकाण. धोडप गड..

फिरण्यासाठी आजूबाजूची पर्यटन स्थळे : Devkund waterfall and Nearest Places

 • रायगड किल्ला : रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये माथा येथील डोंगरावर असून दख्खनच्या पठारावर चा हा सर्वात अवघड अशा प्रकारचा किल्ला आहे येथे जाण्यासाठी तुम्ही रोपवेचा सुद्धा वापर करू शकता.
 • ट्रामवे याद्वारे तुम्ही चार मिनिटांमध्ये किल्ल्यावर पोहोचू शकता.
 • कर्नाल किल्ला आणि अभयारण्य
 • हे कीप हिल म्हणून सुद्धा ओळखले जाते हा एक प्रकारचा डोंगरी किल्ला असून तो पनवेल पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे
 • हे ठिकाण कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये एक संरक्षित प्रकारचे ठिकाण आहे
 • कर्नाळ किल्ल्याची उंची ही 439 मीटर म्हणजेच 1440 फूट आहे.
 • या किल्ल्यावर ट्रेकिंग साठी आणि पर्यटन म्हणून सुद्धा जाता येते.
 • या किल्ल्यापासून धबधब्याचे अंतर हे अडीच तासां चे असून
  96 किमी इतके आहे.
 • नौगाव बीच : नौगाव हे अरबी समुद्र किनारी एक गाव असून आपल्या कोकण प्रदेशामध्ये समुद्रकिनाऱ्यासाठी हे अतिशय प्रसिद्ध आहे.
 • अलिबाग पासून अवघ्या नऊ किलोमीटर आणि मुंबईपासून 114 किलोमीटरवर आहे
 • हा समुद्रकिनारा तेथील स्वच्छता व पाण्यातील खेळांमुळे लोकप्रिय आहे
 • काशीद बीच . हा मुरुड तालुक्यामध्ये येत असून अरबी समुद्राच्या किनारी बसलेले एक गाव आहे.
 • हे अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्याचे गाव असून येथील समुद्रा किनारा हा प्राचीन प्रकारचा आहे.
 • तसेच येथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता ही मनमोहक आहे

तर मित्रांनो आज चा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा.

तर काळजी घ्या आणि या ट्रेकला एन्जॉय करा तसेच तुमच्या फॅमिली आणि मित्र-मैत्रिणींना हा लेख नक्की शेअर करा.

google.com

About Author

Hello, I am Traveler and i love to write about it.

You might also enjoy: