मित्रांनो फिरायला जायचे असेल तर यासाठीचा उत्तम काळ म्हणजे पावसाळा. पावसाळ्यामध्ये तुम्ही विविध ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य सुद्धा अनुभवू शकता. Changwateshwar Temple Saswad

तिथे जाता जाता लागणारे डोंगर नद्या यांचा आनंद तुम्ही प्रवास करताना घेऊ शकता. आज आपण अशाच प्रकारच्या ठिकाणाबद्दल माहिती घेणार आहोत.

Changwateshwar Temple Saswad येथे पाहण्यासारखे

संगमेश्वर मंदिर सरदार गोदाजी जगताप यांची समाधी, पुरंदरे वाडा, चांगवटेश्वर मंदिर, सोपान देव समाधी, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समाधी स्मारक.

Changwateshwar Temple Saswad या मंदिराचा इतिहास

हे मंदिर पांडवकालीन असून चांगवटेश्वर नावातच “श्वर” आला आहे म्हणजेच हे महादेवाचे मंदिर आहे.

हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून या मंदिराचे तोंड हे पूर्व दिशेला आहे या मंदिराला 25 दगडी पायऱ्या आहेत तसेच या मंदिराची रचना ही संगमेश्वर शी मिळत असल्यामुळे या मंदिराला संगमेश्वर असे ही म्हणतात.

या मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय सुंदर व अप्रतिम असून दीपमाळ नंदी कासव हे पाहण्यासारखे आहे.

या मंदिराचे शिल्प हे सुंदर असून एक-एक नक्षी काळ्या पाषाणात कोरलेली आहे. अप्रतिम नक्षीकाम तसेच मंदिराच्या भिंतीवर सुंदर अशी कलाकुसर असे या मंदिराचे शिल्प आहे.

मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिर असून मंदिराचा परिसर हा स्वच्छ आणि व्यवस्थित आहे. तसेच याची देखरेख सुद्धा उत्तम प्रकारे चालली आहे.

हे मंदिर पुण्यापासून 34 किलोमीटर अंतरावर व सासवड पासून दोन ते तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे

येथे जाण्यासाठी तुम्हाला पुण्यामधून सासवडला यावे लागेल.

सासवडचा आधीपासूनच मोठा इतिहास आहे इथे सरदार पुरंदरे यांचा वाडा आहे. सासवड हे त्यांना इनाम म्हणून मिळालेले असे हे गाव होते.

बाळाजी विश्वनाथ हे पेशवे होण्याआधी सरदार पुरंदरे यांच्याकडे कामाला होते, आणि त्यानंतर ते शाहू महाराजांचे पेशवे झाले मात्र तरी सुद्धा ते सासवड इथूनच सर्व कारभार पाहत होते.

बाजीराव पेशवे हे सुद्धा सुरुवातीचे दहा वर्षे इथूनच कारभार पाहत होते.

अशा या सासवडला आणि सासवडच्या आसपासच्या गावांमध्ये बरीच महत्त्वाची ठिकाणे आहेत.

सासवड मधील संगमेश्वर आणि संघटेश्वर ही दोन मंदिरे शांतता आणि पावित्र्याची अनुभूती देणारी अशी मंदिरे आहेत.

इथे आल्यावर तुम्हाला फारच शांतता लाभेल.

अद्भुत असा कुंभे धबधबा…

Changwateshwar Temple Saswad मंदिर परिसर

संगमेश्वर मंदिर हे कर्हा आणि चांबळी किंवा भोगावती या नदीच्या संगमावर बांधले गेलेले असून या मंदिराचा सर्वच परिसर हा अत्यंत रमणीय असा असून या ठिकाणचे हे सर्वात सुंदर मंदिर आहे.

येथील जांभळी नदीवरून जाण्यासाठी लोखंडी पूल बांधला गेला आहे येथूनच मंदिरात प्रवेश करता येतो.

मंदिरात प्रवेश केल्यानंतर दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते वरती प्रशस्त आवारामध्ये दगडी बांधकाम केलेले मंदिर दिसते

या मंदिराच्या आत मध्ये भव्य असा आनंदी आणि सुंदर आणि छान कोरीव काम केलेले स्तंभ आहेत.

चांगवटेश्वर मंदिर कधी बांधले गेले असेल याचा कुठेही उल्लेख दिसत नाही.

तरीसुद्धा अंदाजे पेशवाई मध्ये किंवा त्याच्या आधी या मंदिराची दुरुस्ती आणि बांधकाम झालेले असावे असा अंदाज बांधता येतो.

मंदिराबद्दल थोडेसे

मंदिरावर आणि मंदिराच्या आत मध्ये सुंदर असे नक्षीकाम पहायला मिळते.

मंदिरासमोर भव्य नंदी आणि आत मध्ये कासव कोरलेले असून गाभाऱ्याचा दरवाजा हा सुंदर असे कोरीव काम केलेला आढळून येतो.

मंदिराच्या शांत थंड वातावरणामध्ये असलेली महादेवाची पिंड हे असे सुंदर दर्शन घेऊन मंदिराच्या आवारात आल्यावर सर्व बाजूंनी नंदीचे दर्शन होते.

या मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा शंकराची दोन मंदिरे आहेत.

मंदिराच्या परिसरामध्ये चांगल्या स्थितीमध्ये दीपमाळा आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधलेले असे तुळशीचे वृंदावन आहे.

या तुळशीच्या वृंदावनाच्या खालच्या बाजूला सुद्धा कोपऱ्यामध्ये एक शिवलिंग आहे त्यामुळे

तुळशीला पाणी दिले की आपोआपच शिवलिंगावर ते पाणी पडते आणि या शिवलिंगाचा अभिषेक होतो.

Changwateshwar Temple Saswad

समाधी

  • मंदिराच्या समोरच सरदार गोदाजीराजे जगताप यांची समाधी आढळून येते.
  • तसेच पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांच्या समाधीचे स्मारक सुद्धा थोडेसे पुढे गेल्यावर दिसून येते.

देवकुंड धबधबा 2023, सर्व माहिती.

इतर माहिती | Changwateshwar Temple Saswad

या मंदिराच्या जवळच सरदार पुरंदरे यांचा वाडा आहे हा वाडा तुम्ही बाहेरून पाहू शकता. बाहेरून हा वाडा अगदी बघण्यासारखा आहे.

सरदार पुरंदरे यांच्या वाड्याची तटबंदी आणि प्रवेशद्वार हे चांगल्या स्थितीत आहे.

पुण्यातील शनिवार वाड्याच्या आधीच हा वाडा बांधला गेला आहे.

असे बोलले जाते की हे मंदिर चांगदेवांनी बांधलेले आहे त्यामुळेच या मंदिराचे नाव चांगवटेश्वर असे पडले असावे असा अंदाज वर्तवता येतो.

या मंदिरांमध्ये सुंदर गौरव खांब भव्य नंदी दोन्ही मंदिरांमध्ये जे नंदी आहे त्या नंदींवर गळ्यात घंटांच्या माळा कोरल्या गेलेल्या आहेत.

आणि या माळा बांधलेली दोराची गाठ ही आता रॉक क्लाइंबिंग मध्ये दोन दोर जोडायला वापरतात अगदी त्याच पद्धतीने ती कोरलेली आहे.

चांगदेव महाराज | Changwateshwar Temple Saswad

चांगदेव महाराज हे एक योगसिद्धी प्राप्त असलेले तसेच त्यांनी चक्क यमाला चकवा देऊन जवळजवळ चौदाशे वर्षांपेक्षा आयुष्य जगलेले अमरत्व नसलेले एकमेव योगी महाराज होते.

त्यांच्याकडे असीम योग साधना, तसेच संजीवन विद्या असल्यामुळे ते मृत शरीरामध्ये सुद्धा पुन्हा जीवन देण्याची शक्ती

तसेच अतिशय हिंस्र अशा पशूंना वश मध्ये करून आपलेसे करून घेण्याची त्यांच्याकडे असीम अशी ताकद होती.

स्वयंभू शिवलिंग | Changwateshwar Temple Saswad

या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की चांगदेव हे पावसाळ्यामध्ये चतुर्मासामध्ये चार महिने मौनव्रत तसेच अंधत्व व्रत म्हणजेच डोळे मिटूनच सर्व व्यवहार करीत असत.

त्यांचे रोजचे काम हे शिवलिंग पूजेचे होते आणि त्यांचा शिष्य हा काळ्या मातीला चांगल्या प्रकारे मळून त्याचे शिवलिंग तयार करून त्याची विधिवत पूजा करीत असे.

पावसाळा असल्या कारणामुळे एक दिवस सतत पाऊस पडत होता या पावसाला कंटाळून त्यांच्या शिष्याने एका मोठ्या पलथ्या वाटीवरच शिवलिंग तयार करून ठेवले.

मात्र जेव्हा चांगदेव हे आंघोळ करून आले आणि त्यांनी शिवलिंगास मंत्र जपले त्यानंतर ते शिवलिंग उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न करत असताना ते काही हाती आले नाही.

फार प्रयत्न करून सुद्धा ते शिवलिंग उचलता आले नाही, व ते न हलवले जाणारे स्वयंभू शिवलिंग चांगदेव यांस दिसून आले.

म्हणून तेव्हा त्यांनी छोटेसे मंदिर बांधून शिवलिंगाची पूजा कायम ठेवली व या सर्व गोष्टीमुळे या मंदिराला चांगवटेश्वर असे नाव पडले.

चांगदेव महाराज व ज्ञानेश्वर महाराजांची कथा

एके दिवशी ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकून चांगदेव महाराजांना वाटले की आपण त्यांना भेटायला जायला हवे,

म्हणून त्यांनी भेटीला येणार आहोत असा निरोप शिष्यांच्या आधारे ज्ञानेश्वर महाराजांना पाठवला.

आपल्या भक्तसमूहा ला सोबत घेऊन, वाघावर बसून ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीस निघाले.

मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे गर्वहरण करायचे ठरवले.

तसेच एका निर्जीव अशा भिंतीवर बसून त्यांनी चांगदेव महाराजांची भेट घेतली.

चांगदेव महाराजांना संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्ट हा ओवी उपदेश केला.

आणि चांगदेव महाराजांचे गर्वहरण करून पुढे त्यांनी लहान बहीण संत मुक्ताबाई यांना चांगदेव महाराजांचे गुरु बनवले.

यामुळे चांगदेव महाराजांचा मुक्तीचा मार्ग सोपा झाला.

  • सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन 1700 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
  • सध्या या देवस्थानाचा मालकीहक्क हा सरदार जय साहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे.

त्याच प्रकारे या गावांमध्ये सोपान देवांची सुद्धा समाधी आहे तसेच इतरही काही मंदिरे आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता.

तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा..

google maps

इतर लेख

चला फिरायला… सर्वात उंच ठिकाण. धोडप गड..

About Author

Hello, I am Traveler and i love to write about it.

You might also enjoy: